नाशिक महात्मानगर : येथे विनापरवाना सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गंगापूर स्टेशनच्या पोलिसांनी छापा टाकून दोन जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, या छाप्यात हुक्क्याची साधने व तंबाखूजन्य पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत.
या संबंधी पोलीस नाईक पगार यांची दिलेल्या फिर्याद नोंदविण्यात आली आहे. अटक केलेल्या दोन आरोपींची नावे हार्दिक अतुल आहिरे (वय 25, रा. समर्थनगर, काठे गल्ली, द्वारका) व कल्पेश सुभाष गांगुर्डे (वय 38, रा. प्रियतमा अपार्टमेंट, स्नेहनगर, म्हसरूळ) ही आहे. हे दोघे काल दिनांक 5 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान महात्मानगर येथे विनापरवाना हुक्का पार्लर चालवीत होते तसेच प्रतिबंधित हुक्का ग्राहकांना उपलब्ध करून देत होते.
या प्रकरणी पोलीसांनी 38 हजार 400 रुपये किमतीचे विविध तंबाखूजन्य पदार्थ असलेली पाकिटे, चिलीम व साहित्य जप्त केले असून, दोघा संशयितांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.