भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ३० जून रोजी अधिकृतपणे कतारला जाणार आहेत. यादरम्यान ते कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत दोन्ही देशांचे हित जपणाऱ्या अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर 30 जून रोजी कतारच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. यादरम्यान एस जयशंकर कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जसिम अल थानी यांची भेट घेतील. भारत आणि कतारचे संबंध खूप चांगले आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४-१५ फेब्रुवारी २०२४ रोजी कतारला भेट दिली होती. यादरम्यान त्यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांची भेट घेतली. परराष्ट्रमंत्र्यांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांचे हित लक्षात घेऊन राजकीय, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, सुरक्षा, संस्कृती यासह विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे