The Sapiens News

The Sapiens News

लोकसभा निवडणुक निकाल : शेअर मार्केट पडले पण कोसळले नाही

4 तारखेला स्टॉक मार्केट खूप कोसळले अर्थात कारण होते. मोदींना निवडणुकात हवेतसे success न मिळणे. मग काय सगळे म्हणाले आत्ता मार्केट 2,3 महिने उठत नाही. त्यातच मला ही काही मित्रांनी विचारले आता पुढे काय ? मी म्हंटले उद्या मार्केटवर असेल आणि झाले ही तसेच. हा दावा मी करण्याचे व तो खरा ठरण्याचे माझे काही आडाखे आहेत.

1 मोदींना जागा कमी आल्या पण एवढया ही नाही की NDA च सरकारच येणार नाही.

2 मार्केट एखादं वेगळं सरकार आले म्हणून एक वेळ पडेल पण कोसळणार नाही.

3 पूर्वी होते तसे खूप काळ बिअर गेम नाही चालत बुल मात्र खूप काळ चालते त्याचं एकमेव कारण हे की stock मार्केटमध्ये आता परदेशी गुंतवणुकदारांची मनमानी चालत नाही. जे लहर आली की मार्केट पाडी. आत्ता भारतीय समाज हा stock मार्केटला गंभीरपणे घेऊ लागला आहे. त्याला आज हे नक्की कळले आहे की समृद्ध होण्यासाठीचा हा सुंदर मार्ग आहे. त्याच मुळे 2010 साली भारतीयांच्या डिमॅट खात्यांची संख्या मात्र 1.80cr होती आणि आज 2024 ला आहे 16.45cr. हे लोक मार्केट पडले तरी 2 दिवसात सवरतात.

4 आज भारतीय अर्थव्यवस्था मजबूत व उद्योग जगभर पसरले आहे. 5 उद्योजक खूप हुशार असतात ते जर BJP ला 10 रुपये दितील तर काँग्रेसला ही 5 रुपये देतील त्यामुळे सरकार कुणाचे ही येवो पॉलिसीमध्ये drastic change होत नाही. त्यात एक अंतर्गत सरकार पडले अथवा जगात खूप काही मोठे झाले नाही.

शिरीष चव्हाण,
संपादक दि. सेपियन्स न्युज

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts