पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘एक पेड माँ के नाम’ मोहीम सुरू केली आहे. श्री मोदींनी दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कमध्ये पिंपळाचे झाड लावले . त्यांनी आपल्या ग्रहाला अधिक चांगले बनवण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन केले आहे आणि माहिती दिली की गेल्या दशकात, भारताने अनेक सामूहिक प्रयत्न केले आहेत ज्यामुळे संपूर्ण देशभरात वनक्षेत्र वाढले आहे. शाश्वत विकासाच्या दिशेने आमच्या प्रयत्नासाठी हे उत्तम आहे, असेही श्री मोदी पुढे म्हणाले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केला –
“आज, जागतिक पर्यावरण दिनी, #एक_पेड़_माँ_के_नाम ही मोहीम सुरू करताना आनंद होत आहे. मी भारतातील आणि जगभरातील प्रत्येकाला आवाहन करतो की, तुमच्या आईला श्रद्धांजली म्हणून येत्या काळात एक झाड लावा. #Plant4Mother किंवा #एक_पेड़_माँ_के_नाम वापरून तुम्ही असे करत असल्याचे चित्र शेअर करा.
“आज सकाळी, मी निसर्ग मातेचे संरक्षण करण्यासाठी आणि शाश्वत जीवनशैली निवडण्याच्या आमच्या वचनबद्धतेनुसार एक झाड लावले. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या ग्रहाला अधिक चांगले बनवण्यासाठी योगदान द्यावे. #प्लांट4मदर #एक_पेड़_माँ_के_नाम”
“तुम्हा सर्वांना याचा खूप आनंद होईल की, गेल्या दशकात भारताने अनेक सामूहिक प्रयत्न केले आहेत ज्यामुळे देशभरात वनक्षेत्र वाढले आहे. शाश्वत विकासाच्या दिशेने आमच्या शोधासाठी हे उत्तम आहे. स्थानिक समुदायांनी या प्रसंगी कशा प्रकारे पुढाकार घेतला हे देखील कौतुकास्पद आहे.”
Vote Here
Recent Posts
इस्रोने युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबा-३ उपग्रहांसह PSLV-C59 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले
The Sapiens News
December 6, 2024
पुरी येथे नेव्ही डे सेलिब्रेशन
The Sapiens News
December 5, 2024
भारताच्या राष्ट्रपतींनी 2024 साठी अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले
The Sapiens News
December 4, 2024
भाजपने विजय रुपाणी, निर्मला सीतारामन यांची महाराष्ट्रासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली
The Sapiens News
December 3, 2024