हा धक्कादायक प्रकार घडला नांदगाव तालुक्यातील बाभूळगाव येथे. येथील रहिवासी अण्णा देवरे यांचा मुलगा भारतीय लष्करात असून त्यांच्या विवाह नोंदणीचा दाखला त्यांना हवा होता त्यांच्याकडे दाखला देण्याच्या बदल्यात त्याच्याच गावाच्या महिला ग्रामसेवकाने लाचेची मागणी केली त्यावर संताप व्यक्त करीत त्यांनी तालुका पंचायत समितीच्या कार्यालयात अर्धनग्न आंदोलन केले त्याची दखल घेत तहसीलदार सुनील सैंदाने यांनी संबंधित प्रकारची चौकशी करण्याचे आदेश दिलेच त्याच बरोबर संबंधित व्यक्तींना दाखला ही तात्काळ दिला.
या प्रकारचे live प्रक्षेपण हे विशाल वडगुळे या इसमाने केले त्यामुळेच तहसीलदार यांच्या पर्यंत हा प्रकार गेला व संबंधितांना तात्काळ दाखला मिळाला.
