पुण्यात एका अमिरजादयाने दारूच्या नशेत दोन व्यक्तींना गाडीखाली चिरडले आणि अवघ्या यंत्रणेचा पोस्मार्टम झाला. अवधी यंत्रणाच विवस्त्र झाली. समाजातच नाही तर मानवी सहजीवणास इतर शाहींच्या तुलनेत उत्कृष्ट मानलेल्या लोकशाहीचे लख्तर वेशिवर टांगली गेली. अशी की मानवतेला लाज वाटावी. एक मुजोर अल्पवयीन मुलास ज्याला कायद्याने मद्यपाण करणे व देणे निषिद्ध आहे. त्याला बेकायदा चालणाऱ्या बार,पब, हॉटेल मधून मद्यच नाही तर बरेच काही दिले जाते. दोन माणसांना उडवनाऱ्या मुलाला पोलीस ठाण्यात VIP वागणूक दिली जाते. पिज्जा, बर्गर दिली जातात. बाल न्यायालयाने या खुन्याला फक्त एक निबंध लिहायला लावून जामिनावर 2,3 तासात सोडलं जात. एक राजकीय नेता तोही आमदार त्याला सोडविण्यासाठी पोलीस ठाण्यात तळ थोकून असतो, डॉक्टर चक्क रक्ताचे नमुनेच बदलतात. पोलीस पिज्जा बर्गरची व्यवस्था करते. पहा एका खुन्याला वाचविण्यासाठी पोलीस डॉक्टर राजकारणी न्याय व्यवस्था मानवतेची चिरफाडच करीत नाही तर तिचे तुकडे ही करतात.
यावरून काय स्पष्ट होते. एक आणि एकच माणूस माजात जगतो ते ही माणुसकी मारून. विविध पेशात असलेल्या या राक्षसांच्या जोरावर.
