विनापावती माती वाहतूक करण्यासाठी २५ हजाराच्या लाच मागितल्या प्रकरणी तलाठी वर्षा रमेश काकूस्ते या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या आहेत त्यांची नेमणूक तलाठी म्हणूण पारोळा येथे आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधिक माहीती देतांना सांगितले की तक्रारदार यांचा विटकामाचा व्यवसाय असून त्यांनी वर्षा काकूस्ते यांचेकडे गौण खनिजाच्या रॉयल्टीपोटी २५ हजार रुपये रक्कम जमा केली होती. सदर रक्कमेची पावती न देता माती वाहतूक करण्यासाठी आलोसे ह्या अधिकचे २५ हजार लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी दिली होती. याच तक्रारीवरून त्यांच्यावर ही कार्यवाही करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागा परिवेक्षण अधिकारी-
श्री. अभिषेक पाटील
मो.न.8888881449
सापळा तपासी अधिकारी
रूपाली खांडवी,
पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे
मो.नं. 8379961020.
सापळा पथक–
पो.हवा.राजन कदम
पो. शि. प्रशांत बागुल
चालक पो. शि. बडगुजर
सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे .