निवडणुकीची सुट्टी, शनिवार रविवार आलेली सुट्टी या मुळे पुढील आठवड्यात चार दिवस बँका बंद राहणार असल्याने या सुट्या पाहून कामे उरकून घ्यावी लागणार आहे.
सोमवारी राज्यातील काही मतदार संघात पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यामुळे या दिवशी बँका या बंद राहणार आहेत. ज्या शहरात मतदान आहे तेथे बँक बंद राहणार आहे. तर १९ मे रोजी बँकांची आठवडी सुट्टी व सोमवारच्या सुट्ट्यांमुळे बँका बंद राहतील. त्यामुळे सोमवारी बँकेत जाण्याचे नियोजन फसणार आहे. मतदानाच्या दिवशी शहरांमध्ये टप्प्यांनुसार बँका बंद राहतील असे निर्देश रिझर्व्ह बँके दिले आहे.
त्यामुळे सोमवारी देशातील ६ राज्य आणि ४९ मतदारसंघांत बँका बंद राहतील. लडाख, ओडिशा, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, बिहार आणि जम्मू काश्मीरचा या राज्यातील काही मतदार संघात मतदान होत असल्याने येथे बँका बंद राहणार आहेत. तर उर्वरित राज्यांत मात्र बँका सुरु राहतील. मुंबई व बेलापूर येथील बँका या दिवशी पूर्णपणे बंद रहाणार आहे.