दिनांक १४ मे २०२४ रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने छत्रपती संभाजी फाउंडेशन नाशिक, सकल हिंदू समाज सिडको यांच्यावतीने सावता नगर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जहाल हिंदू रक्षक म्हणून ख्यातनाम असलेल्या तसेच कट्टर हिंदुत्ववादी शेर व भाजपाचे राजकीय नेते टी राजा भैया यांचे व्याख्यान नाशिककारांसाठी आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात बोलताना टी राजाभैया यांनी आपल्या शैलीत हिंदू जागर प्रेषकांपुढे मांडला. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांची महंती सांगितली. त्यांनी लव जिहाद, लँड जिहाद,धर्मांतर, वक्फ बोर्ड कायदा व गोहत्या निषेध यावर भाष्य केले. व्यख्यानाच्या शेवटी त्यांनी प्रेषकांना धर्म रक्षणाची शपथ दिली.
हिंदूंना आपल्या धर्माचा अभिमान, अस्मिता, आदर करण्यासाठी प्रेरित केले. सनातनी युवक युवतींना धर्मासाठी वाहून घेण्याचे आव्हान केले.
या कार्यक्रमात लोकसभेचे उमेदवार शांतिगिरी महाराज देखील आलेले परंतु ते मंनच्यावर उपस्थित नव्हते.
या सभेला प्रचंड गर्दी जमलेली यात सर्व वयोगटातील प्रेक्षक उपस्थित होते. लोकांना बसण्यासाठी देखील जागा उपलब्ध नव्हती