डाउनटाउन मॅनहॅटनमधील 86 ट्रिनिटी प्लेस येथील वॉल स्ट्रीटवर अमेरिकेच्या stock मार्केटचे कार्यालय आहे. तेथील परिसरात जनसामान्यांना बसण्यासाठी वर छायाचित्रात दाखविलेला बेंच तेथे आहेत.
परंतु त्याची रचना अशाप्रकारची आहे की तेथे फक्त लोक बसू शकतात त्या बेंचवर लोळू व झोपू शकतं नाही. त्यासाठी ही जागा व पर्यायाने बेंच ही प्रतिबंधित आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की बेरोजगर व बेघर लोक येथे येतात व या जागेचा झोपण्यासाठी वापर करतात. वाईट हे की प्रशासनाने अथवा अमेरिकी शासनाने बेंचची रचना बेरोजगारांना त्या जागेवर झोपण्यासाठी तर चलाखीने प्रतिबंधित केली. परंतु बेरोजगारीस प्रतिबंध करण्यासाठी मात्र आजवर कोणतेही ठोस पावले उचलण्यास कमी पडली.
वाईट हे की तरी देखील आपण या देशांना व तेथील सरकारला अतिशय हुशार वा बुद्धिमान समजतो वा संबोधतो. आज अमेरिकेत बेरोजगारी व कर्जबाजारी लोकांची संख्या त्यांच्या लोकसंख्येच्या मानले 3.9% (65 लक्ष)आहे आणि बेघर आहेत 85 लक्ष. या लोकांचे दुर्दैव हे की युद्धखोरीत खेचाखेची, रक्तपिपासू, जगभरात भांडणे लावण्यात, शस्त्र विकण्यात, जगावर पोलीसिंग करण्यात अमेरिकन जेवढा वेळ,पैसा व घाणेरडे डोके वाया घालतात त्या मानाने देशांतर्गत प्रश्न सोडविण्यात मात्र कमी पडतात.
Spc
