श्री शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक सुभाषचंद्र कौशलप्रसाद मिश्रा, उपशिक्षक दिनेशकुमार जमुनाप्रसाद पांडे यांना लाच घेतांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि.११/०५/२०२४ रोजी रंगेहात पकडले. संबंधित दोघे हे फिर्यादीकडून इमारत निधीच्या नावावर दहा हजाराची लाच स्वीकारतांन पकडण्यात आले. फिर्यादी यांच्या दोन मुलांना शाळेत प्रवेशासाठी संबंधितांनी दोन मुलांसाठी सोळा हजाराची लाच मागितल्याचे सांगण्यात आले. त्यातील पहिला हप्ता हा दहा हाजार होता. याप्रकरणी सातपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विश्वजीत जाधव, प्रणय इंगळे, सुनिल पवार, सचिन गोसावी, दीपक पवार यांनी बजावली आहे.
