नाशिक : सिन्नर येथील शिवडे गावाजवळ नागपूर मुंबई महामार्गावर चॅनल क्रमांक ५८२ येथे एक महिंद्र पिकअपचे टायर फुटल्याने गाडीचा अपघात झाला. मदतीसाठी गेलेल्या सुरक्षा व मदत पथकाला तात्काळ लक्षात आले की संबंधित गाडी ही प्राण्यांचे मांस वाहून नेत आहे. पोलीसांनी कार्यवाही करीत दोन टन गोमांस जप्त केले असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. तसेच संबंधित गाडी जप्त करण्यात आली आहे.
