बजाज फायनान्स कंपनीचे वसूली अधिकारी प्रशांत बोरसे व इतर कर्मचा-यांनी धमकी दिल्याने माझे पती श्रावण गुरनुले यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांची पत्नी नीता यांनी केला असून याबाबत अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी सुवास्तु अपार्टमेंटमध्ये वाचमन रूममध्ये एक महिन्यांपूर्वी घडली श्रावण यांनी कपड्याच्या साहाय्याने पंख्यास लटकून आत्महत्या केली होती.
