भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने आणखी एक यादी जाहीर केली आहे. भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उज्ज्वल देवराव निकम यांना उमेदवारी दिली आहे. उज्ज्वल देवराव निकम हे २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी विशेष सरकारी वकील आहेत. या जागेवरून भाजपच्या पूनम महाजन या विद्यमान खासदार आहेत.
