गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्यानं होणारे बदलान मुळे नवनवीन समस्य़ा निर्माण होताना दिसत आहेत. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा बसला आहे.तर, काही भागांमध्ये मात्र उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना हैराण केलं आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवामानात पुन्हा एकदा काही मोठे बदल होऊ शकतात असा इशारा वर्तवण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहील.तर, शहर आणि उपनगरात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोंकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.