मनमाड : येथील बस स्थानकात एका एसटी बस चालकास एका महिले सह चार जणांनी मात्र बसण्याच्या जागेच्या वादातून बेदम मारहाण केली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. मारहाण करणाऱ्या विरुद्ध मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्यात अतिशय संताप व्यक्त करण्यात येत आहे.
