रविंद बळीराम दहिते वय ५४ अव्वल कारकून धान्य वितरण अधिकारी कार्यालय मालेगाव यास १५ कुटुंबाची राशन करणे नोंदणी online करण्याच्या कामासाठी २२ हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले.
या विषयी अधिक माहिती अशी की तक्रारदार हे लाकून खरीदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्याच बरोबर ते समाज कार्य ही करतात. त्याच अनुषंगाने त्यांनी १५ गरीब कुटुंबाची अंत्योदय योजना व पिवळे रेशन कार्डची रेशन मिळण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी प्रकरणे सादर केली आहेत. तक्रारदार हे दिनांक ०४/०४/२०२४ रोजी मालेगाव येथील रवींद्र दहिते, अव्वल कारकून धान्य वितरण अधिकारी कार्यालय मालेगाव यांच्याकडे हे प्रकरण गेले असता त्यांनी प्रत्येकी कुटुंब १५०० रुपये अशी मागणी केले ती रक्कम होते २२५०० एवढी त्यानी ती रक्कम ०८/०४/२०२४ रोजी स्वीकारत त्यातील ५०० परत ही केले जे सर्व पंचासमक्ष झाले त्याच वेळी त्याला ACB च्या पथकाने ताब्यात घेतले.
या पथकात अनिल बडगुजर, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
पोलीस नाईक/ दिपक पवार पोलीस शिपाई/ संजय ठाकरे सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक हे अधिकारी कर्मचारी होते.
