मतदानाचे महत्व व जागरूकता समाजात अधिक मोठ्या प्रमाणात वाढावी यासाठी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक या शाळेच्या कलाशिक्षक देव हिरे यांनी शाळेतील फलकावर अतिशय सुंदर कलाकृती रेखाटली आहे.
यात त्यांनी भारत + भाग्य + विधाता = मतदान तसेच मतदान करायचं हं अशा आशयाचे सुंदर चित्र रेखाटले आहे.
