आर्थिक वर्ष २०२३-२४ मागील महिन्यात म्हणजे 31 एप्रिलला संपलेले असून मूल्यांकन वर्ष २०२४-२५ चे IT विवरणपत्र भरण्यासाठी करदात्यांनी सुरवात केली आहे. त्या संदर्भातील कागदपत्रे देखील जमा केली जात आहे. दिवसेंदिवस तंत्रज्ञान विकसित होत असून माहिती व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विविध क्षेत्रात सुधारणा होत आहे. आयकर विभागाकडून देखील मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करून करदात्यांसाठी अधिक तत्पर सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न केला जात असून. यावर्षी प्रथमच आयकर विभाग, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) ने रिटनची प्रक्रिया वेळेत व सुलभ करण्यासाठी IRT FORM लवकर अधिसूचित केले आहेत. त्यामुळे करदात्यांना १ एप्रिल २०२४ पासूनच आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचे आयकर विवरणपत्र भरण्याची सुविधा वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की, आयकर विभागाने करदात्यांना नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांचे विवरणपत्र भरण्यास पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
