नाशिकमध्ये २५०० रुपयांची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. शंकर जनार्दन गोसावी, सहा. पोलीस उपनिरीक्षक असे लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांची नेमणूक नाशिक शहर पोलीसच्या ( आयुक्ताल्य) विशेष शाखेत (SB) आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे नाशिक शहरात एक कॅफे चालवितात. सदर कॅफे हे कॉलेज परिसरात असून तेथे विद्यार्थी मुले मुली यांची गर्दी असते. त्यामुळे यांना गोपनीयता असावी म्हणून तक्रारदार व कॅफेचे मालक यांनी रेस्टॉरंट मधील बाकांना आडोसा होईल अशी बसण्याची व्यवस्था केली आहे.
हे गोसावी याला कळताच त्याने सुमारे सहा महिने पूर्वी कॅफे मालक यांच्याकडे येऊन त्यांना तु वेश्या व्यवसाय चालवितोस तुझ्यावर कायदेशीर कारवाई करेन असा दम देऊन कॅफे मालकास कॅफेवर व त्यांच्यावरही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दरमहा २००० ते ३००० रुपये हप्ता म्हणून लाच बांधून घेतली.
कॅफे मालकात ते मात्र कॅफे चालवीत असून कोणताही बेकायदा व्यवहार करत नाही. तरी देखील संबंधित कर्मचारी हा लाच मागतो व विनाकारण कायद्याचा धाक दाखवतो याचा तीव्र संताप होता प्रामाणिकपणे व्यवसाय करणे ही संबंधित व्यक्तीने अवघड केल्याने कॅफे मालकाने शंकर गोसावी यांची तक्रार नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागासास केली. त्याच तक्रारीची गंभीर दखल घेत आज संबंधित विभागाने ही कार्यवाही केली ज्यात शंकर गोसावी हा रंगेहात लाच स्वीकारताना पकडला गेला. या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता गोसावी हा विशेष शाखा आयुक्तालय येथे नेमणुकीस असतांनाही व त्यांचे कार्यक्षम व कामाचा अथवा कर्तव्याचा भाग नसतांना ही त्याने येवढे मोठे धाडस करणे किती गाढवपणाचे होते याचीच चर्चा पोलीस विभागात आहे. जेथे प्रत्यक्षत कर्तव्य बजावतांना ही असे विनाशकाली विपरीत बुद्धी प्रकार करणे सदाचाराला व नैतिकतेला अनुसरून नाही तेथे संबंधित कर्मचारी असले निर्बुद्ध व अधोरी धाडस करूच कसा शकतो ? हा प्रश्न सर्वाना पडला आहे.
तक्रारदार यांचे restuarant सुरळीत चालू देण्याचे मोबदल्यात गेल्या ३ महिन्यांपासून दरमहा तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारात असल्याची कबुली गोसावी याने दिली. आज त्याने २५०० रुपये लाच मागणी करून ती रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु आहे. असले विकृत धाडस कोण करीन ज्याने अवघ्या पोलीस विभागाची प्रतिमाच मलिन होईल ? जेथे नवनियुक्त पोलीस आयुक्त जनसामान्यात पोलीस विभागाची प्रतिमा सुधारण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत समाजाभिमुख पोलीसिंग करण्याचा प्रयत्न करीत असतांना शंकर गोसावी सारखे कर्मचारी पोलीसांची सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचे कुकृत्य करीत असल्याने सामाजिक स्तरावर संताप व्यक्त केला जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बबन घुगे, पोलीस नाईक गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई नितीन नेटारे यांनी केली.
संपादक : शिरीष प्रभाकर चव्हाण
दि. सेपिअन्स न्युज