सिटी सेंटर मॉल जवळील ऐतिहासिक श्री म्हसोबा महाराज मंदिर लगतच्या दोंदे पुला समोरील नंदिनी नदी पात्राच्या दुथडीला संरक्षक भिंत बांधण्याचे काम जोरात सुरू असून या भिंतीमुळे पावसाळ्यात नंदिनी नदीला येणाऱ्या पुराचे पाणी सभोवतालील परिसरात येणार नाही.
दरवर्षी नदीला येणाऱ्या पुराचे पाणी उंटवाडी, CCM छत्रपती संभाजी चौक परिसरातील वसाहतीत शिरते, त्यामुळे तेथील सदनिका, वाहने व दुकानांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते यात त्यांची वित्तीय हानी ही मोठ्या प्रमाणात होत असते त्याच प्रमाणे उंटवाडी, नवीन नाशिकचा संपर्क उर्वरित नाशिकशी तुटतो, दरवर्षी येथील नागरिकांना प्रचंड प्रमाणात होणारा त्रास टाळण्यासाठी ही संरक्षक भिंत बांधण्याचे नाशिक महानगरपालिके ने योजिले आहे.
सदर भिंत ही अग्निजन्य खडकात लोखंडी जाळी लावून बांधण्यात येत असल्याने पुराच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहात ती धसण्याची अथवा वाहून जाण्याची जोखीम नसेल. तरी देखील सदर कामाची गुणवत्ता व मजबुती येत्या पावसाळ्यातच परिक्षली जाईल.
संपादक : शिरीष प्रभाकर चव्हाण : दि. सेपिअन्स न्युज