भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार मार्चमधील सर्व रविवार, तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील. याशिवाय आरबीआयने दिनांक 1, 8, 22, 25, 26, 27 आणि 29 मार्च रोजी बँकांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. मार्चमध्ये 5 रविवार येतात म्हणजेच 3, 10, 17, 24 आणि 31 मार्च रोजी बँकांमध्ये नियमित सुट्ट्या असतील.
मार्च 2024 मध्ये एकूण 14 दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. यामध्ये महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी असणाऱ्या सुट्यांचाही समावेश आहे.महाशिवरात्री, होळी, गुड फ्रायडे या निमित्त महाराष्ट्रात बँकांना सुट्टी असेल