आमच्या येथे एक निवृत्त शिक्षक काका आहेत म्हणजे काही वर्ष होते. आत्ता ते शिफ्ट झाले त्यांनी त्यांच्या कार पार्किंगमध्ये एक बेंच लोकांना बसण्यासाठी ठेवला आहे. विशेष हे की आज त्या बेंचवर अनेक लोक येतात, बसतात, विसावतात, सुखदुःखाच्या गप्पा मारता, आपले अनुभव सामाईक करतात. यात आबालवृद्ध तसेच तरुण, बालगोपाळ सर्वच आहेत.
येथे बसल्याने एक छान निवांतपणा वाटतो, मन सुखावते, अपर्टमेंटच्या आवारातील सुंदर वातावरणाचा, वृक्षवेलिंचा, पक्षांचा आनंद येथे मिळतो.
थोडक्यात हे काका येथे आज राहत नाहीत पण त्यांनी सदकर्मात केलेली इन्व्हेस्टमेंट्स रोज त्यांच्या खात्यात पुण्यांची बचत वृद्धीगत करते.
त्यांनी एकदा केलेली FD त्यांना सर्वोत्कृष्ट व्याजाचा परतावा देते अगदी नित्याने. मी त्यांना आज गमतीने म्हणालो ही, येथे जेवढे बुड टेकतील तेवढे पुण्याचे डॉलर तुमच्या नशिबाच्या खात्यात जमा होईल आणि ते होता ही आहेत.
मला वाटते अशा one time investment देणाऱ्या गोष्टींत थोडी का होईना इन्व्हेस्टमेंट्स करावी आपण, नाही का ?
मी hard core invester आहे आणि मी पैशात व पुण्यातही invest करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून हे जाणवले आणि आपल्या पुढे मांडले….
Spc

संपादक : शिरीष प्रभाकर चव्हाण