सरकारी योजनेतील लाचखोर डॉक्टरगीरी
राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत शस्त्रक्रिया केल्याने मोबदला म्हणून लाचेची मागनी केल्याने दोन खासगी डाॅक्टरांवर नशिकमध्ये कारवाई करण्यात आल्याने बैद्यकीय तसेच इतरही क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ७००० रुपयांची लाच घेताना डॉक्टर महेश बुब व महेश परदेशी एसीबीच्या ट्रॅप मध्ये अडकले आहेत. या प्रकरणात तक्रारदाराच्या आईच्या हातावर शस्त्रक्रिया केल्याने लाचेची मागणी करण्यात आली होती. निफाड तालुक्यातील पिंपळगावच्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची राज्यातील अशी पहिली कारवाई असावी, असे बोलले जात आहे.
या प्रकरणातील लाचखोरीचा घटनाक्रम
एक फेब्रुवारीला रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यात आलं. रुग्णाला शस्त्रक्रिया योजनेचा लाभ मिळेल असे सांगण्यात आले पाच फेब्रुवारीला रुग्णाकडून शस्त्रक्रियेसाठी वीस हजाराची मागणी करण्यात आली. सात फेब्रुवारीला रुग्णांच्या नातेवाईकांनी 20 हजार 500 रुपये कॅन्टीन वाल्याकडे सुपूर्द केले. आठ फेब्रुवारीला रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया योजनेत बसल्याचं सांगण्यात आलं.