The Sapiens News

The Sapiens News

किसान आंदोलन

सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर मंगळवारपासून लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच करण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी दिल्लीला लागून असलेल्या सर्व राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या.

तसेच दिल्ली कडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त देखील ठेवला होता. अशातच पंजाब-हरियाणाच्या शंभू बॉर्डरजवळ शेतकरी आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाली.दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी शंभू बॉर्डरजवळ रोखण्याचा प्रयत्न केला.

यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत बॅरिकेट्स तोडण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे शंभू बॉर्डवर धुराचे लोट दिसून येत होते. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये काहीशी झटापट देखील झाली होती.

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
UPSE Coaching

Recent Posts