नाशिक : देशातील उत्कृष्ट पोलीस दल म्हणून नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमाही सदैव जनसेवकाची असावी शासकाची नाही हे असे प्रतिपदान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केले. त्यांनी ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा समारोप प्रसंगी नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी संबोधित केले.
पोलीस दलातील व्यक्तींची शारीरिक व मानसिक सुदृढता सकारात्मकतेने वृद्धीगत व्हावी या उद्देशाने भरवण्यात येणाराऱ्या या स्पर्धांचे महत्व पोलीस दलात अनन्यसाधारण आहे.
