आज असेच CCM सिग्नलवर उभा होतो. तर वर pic मध्ये असलेला मुलगा दिसला खूप थकलेला वाटतं होता. कारणही तसेच होते. कारण तो पाण्याचे जार वाटप करणाऱ्याकडे कामाला आहे. रोज अति जड जार हे विविध दुकानात बिल्डिंगमध्ये पोहोचवतो. तुम्ही विचार करा काय अवस्था होत असेल त्याची आणि कामाची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजे पावेतो. वाईट अवस्था ही की एवढ्या कठीण कामासाठी त्याला मात्र रोज आहे 200 ते 300 रुपये (त्याने सांगितल्याप्रमाणे). मग प्रश्न हा आहे की दिसण्याने कदाचित 18 वर्षे ही पूर्ण न झालेली ही मुले एवढे काबाडकष्ट का वेचतात ? तर त्याची 2 कारणे असू शकतात. 1 अगदी लहान वयात खांद्यावर पडलेली जबाबदारी 2 आर्थिक व व्यवसायीक शिक्षणापासून यंत्रणेने ठेऊ केलेला दुरावा. जो मला नेहमीच हेतूत वाटतो.
दुर्दैव हे की अशा अवस्थेत ही ही निरागस मुले करणार तरी काय ? आणि या वयात त्यांना जीवनातील अर्थकारणाचे महत्व व व्यवसायासाठी लागणारी छोटीशी का होईना गुंतवणूक देणार आणि शिकवणार तरी कोण ? कारण सामाजिक स्तरावर 90% लोक तर अज्ञानी आहे. वाईट याचे वाटते की याचे वडील आजेपंजे ही अशीच छोटी मोठी कामे करीत असतील आणि शक्यतो याच्या पुढील पिढी ही तेच करीत राहणार. जोवर त्यांच्या जीवनात वेगळा सुधारित विकसीत विचार येत नाही तोवर. पण तो येण्यातच 4,5 पिढ्या निघून जातात. काय दुर्दैव आहे नाही का ? याच एक उदाहरण देतो मी काही वर्षांपूर्वी एका पाड्यावर गेलेलो तेथे काही महिला 4 किमी दरीतून पाणी आणीत होत्या, पुढे विचारले तर कळले त्याच्या मागील 10,15 पिढ्या हेच करीत आल्या आहे आणि याची काहीच शास्वती नाही की यांच्या मुली नातींच्या वाट्याला ते येणार नाही. देश प्रगती नक्कीच करतो आहे परंतु तिची फळे नक्की कुणाच्या वाट्याला येत आहे हा मात्र संशोधनाचा विषय आहे.
संपादक
शिरीष प्रभाकर चव्हाण
दि. सेपिअन्स न्यु