The Sapiens News

The Sapiens News

Social media : नैराश्य व उपाय

अति अपेक्षा हे नैराश्य, राग द्वेष, हेवेदावे, वादाचे कारण

    लोक नेहमी नाराज असतात आणि कारण असत प्रतिसाद न मिळण्याचं. मग तो call ला असो message ला असो, Post ला असो की आणखी कशाला आपली प्रत्येक कृती लोकांसाठी असते त्यांना दाखवण्यासाठी, त्याचा प्रतिसाद मिळण्यासाठी आणि तो ही छानच हवा, त्यांनी आपले आपल्या गोष्टींचे कौतुक करावे हीच आपली अपेक्षा असते. याचा सरळ अर्थ असा की आपण आपल्या चांगल्या गुणांना प्रयत्नांना लोकांच्या प्रमाणपत्राची अपेक्षा ठेवतो आणि हे सोशल मीडियामुळे अधिक वाढले आहे. येवढे की आपण मनोरुग्ण झालो आहोत. हे असच आहे. जस बाळ आपलं आणि त्याच नामकरण करण्याची, कौतुक मिळवण्याची अपेक्षा शेजाऱ्याकडू. ही विकृती एवढी वाढली आहे की likes च्या अट्टाहासात विकृतीत परावर्तीत झाला आहे. आपण आपल्या post ला likes, comments, share न मिळणे आपला अवमान समजतो आणि त्यातूनच राग, द्वेष, वाद, भांडणे होतात. आपल्याला appreciation न मिळणे म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व आनंद हिरावून जाणे समजतो आणि हे सर्वान बरोबर होते हा मानवी स्वभाव आहे.

    म्हणूनच पुढील 10 tips Post टाकतांना ध्यानी घेतल्या तर आपणास आत्मक्लेश होणार नाही हा Spc Times चा विश्वास आहे.

1 Post टाकल्यावर त्यावर खुप लक्ष देऊ नका, छान काम केल्याचा आनंद घ्या परंतु likes मोजत बसू नका.

2 Post चे खुप कौतुक झाले तरी अधिक उत्साही होऊ नका नाहीतर भविष्यात कमी प्रतिसाद मिळाला तर नेराश्या येईल.

3 आधी स्वतःला विचारा तुम्ही किती लोकांना likes, share, comments करतात त्यांचं कौतुक करतात आणि करीत जरी असला तर त्यांनी केलंच पाहिजे हा तुमचा हट्ट विकृती आहे.

4 बऱ्याच Post ह्या तुमच्यासाठी उपयुक्त असतील पण इतरांसाठी नसतील हे ही ध्यानी घ्या.

5 तुमची Post एक विचार आहे तुमचे मूल नाही म्हणून Post वर likes न मिळणे तुमचा अवमान नसतो.

6 बहुतेक लोक Post म्हणून दुसऱ्याचे विचार फॉरवर्ड करतात व अपेक्षा ठेवतात की ती पसंत करावी. ते असच आहे शेजारच्याचा मुलगा परीक्षेत पहिला आला आणि तुम्ही तुमच्या कौतुकाची अपेक्षा ठेवतात.

7 जर तुम्हाला कौतुकाची विकृती असेल तर सोशल मीडियावर जाऊच नका लोक त्यांच्या mood प्रमाणे वागतात तुमच्या mood शी त्यांना काहीही देणे घेणे नसते.

8 लोक प्रत्येक Post ची नोंद घेतात विशेषतः तुमचे विरोधक जर ते नियमित post पाहत असतील (आणि पाहतातच ) तर तुमचा जो ही संदेश, हेतू, उद्देश आहे. तो असाही पूर्ण झालेला असतो म्हणून समाधान माना.

9 सर्वात महत्वाचं तुमचे विचार जर उच्च व उदात्त दर्जाचे असेल तर शब्दाचे महत्व न समजणाऱ्याकडून तुम्ही अपेक्षा तरी कशी ठेऊ शकाल.

10 अतिशय महत्वाची गोष्ट प्रतिसाद काहीही असो छान काम करीत रहा त्या पेक्षा मोठे समाधान नाही. 

11 कुणाचे कौतुक करणे ही खूप अवघड व मोठी गोष्ट आहे आणि अवघड काम सर्वानाच जमत नाही. त्यासाठी विशेष क्षमता व मोठं मन लागते ते नसणाऱ्यांना व त्यांच्या मानसिकतेला समजून घ्या.


Spc times च्या या tips आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरतील यात शंका नाही कारण spc times च्या तज्ञ मंडळींनी शास्त्रीय अभ्यासांती आपल्याकरिता त्या विश्लेषित केल्या आहे.

Team : THE SAPIENS NEWS

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts