सध्या अवघा भारत श्रीराममय झाला आहे. गल्लीबोळात, गाव, शहर, राज्येच नाही तर देशविदेशातही रामनामाचा गजर ध्यान व घ्यास लागला आहे. आबालवृद्ध, नेते, अभिनेते, गरीब, श्रीमंत तसेच समाजातील प्रत्येकवर्गात 22 जानेवारीची ओढ होती व त्याच्याच तयारीत जनाजनांनी बाजारपेठेतून श्रीराम छायाचित्र प्रतिमा, झेंडे, पताका, पूजेचे साहित्य खरेदी केली. प्रत्येक व्यक्ती आपाआपल्या परीने श्रीरामसेवेत आपले योगदान, श्रम समर्पित करू पाहत आहे.
आज प्रत्येक घराघरात इमारती, वसाहती गल्लीत, कॉलनीत श्रीराम नामाचा जयघोष व राम मंदिर स्थापनेचा उत्सव साजरा केला जात आहे. तसेच सर्वत्र श्रीराम प्रतिमा पूजन, आरती महाप्रसाद यांचे आयोजन केले आहे. त्याच अनुषंगाने उंटवाडी जगताप नगर येथील आदित्य गोल्ड सोसायटीत देखील सर्व सभासदांनी सहकुटुंब श्रीराम मंदिर प्रतिष्ठापणा उसत्व मोठ्या उत्साहात व सुसंस्कृत पद्धतीने साजरा केला.
यात महिलांनी सडा, रांगोळी, फुलांची आरास अतिशय सुंदरतेने रेखाटली व सुशोभित केली. पुरुषांनी स्वतः संपूर्ण इमारत परिसर स्वच्छ केला अतिशय सुंदर, स्वच्छ, प्रेरक, सकारात्मक, सुसंस्कृत व साधेपणे हा जन व जग उत्सव साजरा करण्यात आला.
या सुंदर व साधेपणाने आयोजित केलेल्या सोहळ्यात श्री गणपती बाप्पा आरती, श्री प्रभू रामचंद्र आरती व श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण करण्यात आले. सर्व सभासदांना आरतीचा मान जोडीने देण्यात आला. या प्रसंगी सोसायटीचे सर्वच सभासद हे पारंपरिक वेशभूषेत होते. प्रत्येक घरातून दिव्यांचे आगमन होऊन त्याद्वारे श्रीरामाची आरती मोठ्या भक्ती भावाने करण्यात आली . हा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जे सभासदांना स्वेच्छा वर्गणीतून करण्यात आले. या कार्यक्रमात वृद्ध वडीलधाऱ्या मंडळींना जेष्ठ नागरिकांना आरतीचा विशेष मान देण्यात आला.
केवळ आदित्य गोल्ड सोसायटीतील या सोहळ्यामुळे अवघा परिसर राममय व मंत्रमुगद्ध झाला व आदित्य गोल्ड सोसायटीच्या या अतिशय मनोहारी कार्यक्रमाचा आनंद हा परिसरातील आबाल वृद्धांनीही घेतला. या कार्यक्रमात अतिशय मनोहारी भक्तीमय श्रीराम भजन वंदना करण्यात आली.
संपादक
दि. सेपिअन्स न्यु