सध्या अवघा भारत श्रीराममय झाला आहे. गल्लीबोळात, गाव, शहर, राज्येच नाही तर देशविदेशातही रामनामाचा ध्यान व घ्यास लागला आहे. आबालवृद्ध, नेते, अभिनेते, गरीब, श्रीमंत तसेच समाजातील प्रत्येकवर्गात 22 जानेवारीची ओढ लागली आहे व त्याच्याच तयारीत लोक बाजारपेठेतून श्रीराम छायाचित्र फ्रेम्स, झेंडे, पताका, पूजेचे साहित्य खरीदीत व्यस्त आहे. प्रत्येक व्यक्ती आपाआपल्या परीने श्रीराम सेवेत आपले योगदान, श्रम समर्पित करू पाहत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून पाटील नगर, नवीन नाशिक येथील किमया केसकर्तनाल्याचे मालक व अतिशय उत्कृष्ट चित्रकार विवेकानंद हरिश्चंद्र गायकवाड यांनी श्रीराम चरणी स्वतःच्या हाताने एक विलोभनिय प्रभूंचे चित्र रेखाटले आहे. हे चित्र इतके विलोभनीय व आकर्षक आहे की त्यांच्या दुकानाच्या येथून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आकर्षणाचा व कौतुकाचा विषय झाले आहे.
पाक्षिक The Sapiens News च्या संपादकांनी त्या दुकानाला व्यक्तिशः भेट देऊन विवेकानंद गायकवाड यांचे अभिनंदन केले. त्यांनी आपल्या स्वतःच्या हाताने केलेली ही कलाकृती नक्कीच सर्वांनी आवर्जून पहावी अशीच आहे.
Team
The Sapiens News
