The Sapiens News

The Sapiens News

क्रीडाक्षेत्र व त्याचा कमकुवत पाया.

      माझ्या एक नातेवाईक आहे. जीवनात कधी ही एका ही साध्या राज्यस्तरीय स्पर्धेत ही सहभाग नाही घेऊ शकला, पण तो आज क्रीडाशिक्षक आहे आणि मी त्याच्या वया एवढया स्पर्धा खेळलोच नाही तर बहुतांश जिंकलो ही. त्याही राष्ट्रीय पण मला पोलीस शिपाई व्हावे लागले. का तर आपले शिक्षण वा शासकीय धोरण जे क्रीडाशिक्षक व्हायला ही राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडुपेक्षा साध्या ग्रॅज्युएट मुलाला महत्व देते. तुम्ही खेळात कितीही मोठी कामगिरी करा इंग्लिश गणित पास केल्याशिवाय तुम्ही क्रीडा शिक्षक होऊच शकत नाही. वाईट हे की इंग्लिश गणित न येताही एक चांगला खेळाडू उत्तम प्रशिक्षक होऊ शकतो आणि क्रीडा शिक्षक होण्यासाठी इंग्रजीव गणित यायलाच हवं असं नसतं. हेच अजून  शासनाला व शिक्षण धोरण बनविणाऱ्यांना उमजलं नाही, माझंच सांगत, कमाल ही की मी क्रीडाशिक्षक नसूनही व पदवीधर ही नसतांना जलतरणात अनेक राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय खेळाडू तयार केले आणि हो अगदी कोणतेही मानधन वा fees न घेता. ना शासनाने काही दिले ना खेळाडूंच्या पालकांनी ना मी कुणाकडून fees घेतली. आणि हो त्या नातेवाईकासारख्या बहुसंख्य क्रीडाशिक्षकांना लाखात पगार मिळत असूनही त्यांच्यातील बहुसंख्य शिक्षकांकडून एकही साधा राज्यस्तरीय पदक विजेता खेळाडू तयार होत नाही. हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे आणि ते आपल्या गलिच्छ शासकीय धोरणांनी आपण ओढुन घेतलं आहे. 

अनेकदा आपल्या क्रीडा धोरणांवर विचार करायला लावणारी प्रश्ने समाजा समोर येतात. पण त्यावर राजकारण होते त्याची सोडवणूक करणारी यंत्रणा कार्यान्वित केली जात नाही आणि हो असले प्रश्न ठराविक वर्षांनीच विचारले जातात जसे Football World Cup, Olympic Games, cricket world cup, Asian Games, Commonwealth games विशेषतः त्यात आपले खेळाडू हरतात तेव्हा. 

The Sapiens news  च्या वाचकांना आश्चर्य वाटेल पण जो क्रीडा शिक्षक क्रीडा क्षेत्राचा आत्मा समजला जातो त्याच क्रीडा क्षेत्रातील कर्तृत्व काय आहे हे क्रीडाशिक्षक अभ्यासक्रमाच्या वेळी पाहणे क्रमप्राप्त असूनही ते पाहिले जात नाही जे पाहिले जावे कारणार त्यावरच तो क्रीडा शिक्षक भविष्यात क्रीडाक्षेत्राला नक्की काय देईल ठरते. आपल्याकडे क्रीडाशिक्षक पदासाठी जी अहर्ता आवश्यक असते ती Bachelor of physical education (B.P.Ed), Master of physical education (M.P.Ed) ही असते. पण आपल्याला आश्चर्य वाटेल. हे शिक्षण घ्यायला क्रीडा क्षेत्रात एक खेळाडू म्हणून कामगिरी केल्याची फारशी कोणतीही आवश्यक नसते. अगदी सहज non sportsmen लाही या एवढ्या महत्वाच्या अभ्यासक्रमास प्रवेश मिळतो. आत्ता तुम्ही सांगा केवळ नौकरी मिळावी म्हणून या अभ्यासक्रमाची निवड खेळाचा कोणताही गंध नसणारी हवशी, गवशी, नवशी मंडळी करतात वा त्यात प्रवेश घेतात. दुर्दैव हे की ग्राउंड व खेळात मोठे कौशल्य असलेली मंडळी येथे ही मागे पडतात कारण अर्थातच खेळाडू नसणारी बहुतांश मंडळी ही अभ्यासात हुशार असते. त्यांनी भूतकाळात खेळ व अभ्यास या दोन्ही क्षेत्रात एकाच वेळी मेहनत घेतलेली नसते. आणि वरील अभ्यासक्रमात त्याच्या लेखी परीक्षेत खेळाडू मंडळी ही खेळाडू नसणाऱ्या मंडळींपेक्षा मागे पडतात, पण ते क्रीडा प्रकार शिकवायला निष्णात असतात पाहिले मात्र जात नाही मग जे नको व्हायला तेच होते. ही खेळाडू मंडळी नौकरीत ही खेळाडू नसणाऱ्या उमेदवारांपेक्षा मागे पडतात. निवड झालेले व खेळाडू नसून ही क्रीडाशिक्षक झालेले मग त्या शाळेचे, महाविद्यालयाचे, संस्थेचे क्रीडा विभागाचे प्रमुख होतात आणि हे मात्र येथेच होत नाही शासकीय नौकरित जेथे ही क्रीडा विभाग प्रमुख तालुका, जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडामार्गदर्शक किवा त्या संबंधीच्या पदांची भरती होते तेथे हे कधीही क्रीडाक्षेत्रात कोणतीही उल्लेखनीय कामगिरी न करणारी मंडळी बहुसंख्येने पाहायला मिळते. ना त्यांना क्रीडाक्षेत्राशी आस्था असते ना फारसे देणे घेणे. आपला खेळाचा तास आटोपणे मुलांना मैदानात खुले सोडून आपण झाडा खाली सावलीत उभे राहणे. हे त्यांचे प्रमुख काम आणि शाळेतील प्रार्थना, समारंभात मुलांना शिस्तीत उभे राहणे शिकवणे उनाड आघाव, गुंड मुलांना आपल्या धाकात ठेवणे हे त्याचे विशेष काम.

आज जर या क्रीडा शिक्षकांच्या कामाचे audit केले तर आपल्याला धक्का बसेल की यातील बहुतांश शिक्षक ना स्वतः कुठली राज्य राष्ट्रीय स्पर्धा खेळले ना यांनी यांच्या पूर्ण सेवेत किमान 10 मुले राज्य, राष्ट्रीय पदक विजेते केले. अनेक क्रीडा शिक्षकांना खेळाचे साधे मूलभूत तत्व ही माहीत नाही मग physiology, andrometry, bio mechanic, Sports Science, sports psychology, sports medicine, kinesiology तर फार वरच्या पातळीतली गोष्ट झाली.

   आपल्या देशाचे दुर्दैव केवळ एकच ते हे की पात्रता नसलेली मंडळी महत्वाच्या ठिकाणी पात्र निभावता आहे. असे नाही की सर्वच क्रीडा क्षिक्षक हे कुचकामी किवा क्रीडाक्षेत्राशी संबंध नसलेले आहेत. नक्कीच आहे पण आज तरी त्यांचे प्रमाण खूप कमी आहे आणि जोवर ते वाढत नाही तोवर खेळाचा खंडोबा होतच राहील. येथे एक गोष्ट नमूद करावी वाटते आणि ती म्हणजे असे नाही की शासनाला हे कळत नाही. कळते शासनातही खूप तज्ञ मंडळी आहे. पण कदाचित त्यांचे काही चालत नसेल किंवा भ्रष्ट यंत्रणा चालू देत नसेल.

 हा लेख प्रपंच केवळ यासाठी की कोणत्याही World Cup, Asian game, Olympic games, International Sports Commonwealth game मध्ये जर आपले खेळाडू कमी पडले तर त्यांना दूषणे देण्या आधी वरील वस्तुस्थिती समजून घ्यावी.

 पाया मजबूत नसेल तर इमारत कधीच पक्की होत नाही. यावर उपाय खूप आहेत, पण शासकीय स्तरावर मान्यता मिळणे व ते कार्यान्वित होणे खूप अवघड असते.

टिप : शासन धोरणे बदलत आहे, पण त्याची फळे आपल्याला अजून किती काळाने चाखायला मिळतील हे सांगणे अवघड आहे.

 शिरीष प्रभाकर चव्हाण

संपादक : the Sapiens news

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
UPSE Coaching

Recent Posts