बातमी व माहिती अशी की आपण ती वाचू, ऐकू व पाहू ही शकतात : फक्त the sapiens news वर
Youtube : लिंक क्लिक करा
सावधान : सण, उत्सव, यात्रा, जत्रा काळात चोऱ्यांचे प्रमाण वाढते. कशी घ्याल काळजी-The Sapiens News वर
आपल्याला वरील शीर्षक वाचून चिंता वाटली असेल व प्रश्न ही पडला असेल ना ? ऐन सणासुदीला हा कसला लेख दि सेपिअन्सने प्रकाशित केला ? तर वरील विषयाचे गांभीर्य व हा विषय ऐन सणासुदीस हाताळण्याचे कारण हे की समाजाला सजग जागरूक करून होणाऱ्या विपरिता आधी सतर्क करणे आम्ही आमचे कर्तव्य व सामाजिक जबाबदारी मानतो व ते काही प्रतिबंधात्मक उपाय स्वता करून, आपण आपल्या विषयी होण्याची शक्यता असेल अशा अपप्रकारांना आळा घालू शकतो नाही का ? आत्ता पाहूया सणसुद व वाढते चोऱ्यांचे प्रमाण यांचे नाते. ते आपण पुढील टप्प्यात पाहूया.
चोऱ्या कधी होतात ?
चोऱ्या लग्न समारंभ, यात्रा, जत्रा, सण सुट्या यांच्या आयोजनाच्या काळात अधिक होतात.
याच काळात चोऱ्या होण्याची कारणे काय ?
कारण याच काळात समाजात, बाजापेठेत, घराघरात आर्थिक उलाढाल, वस्तूंचे आदानप्रदान, प्रवास, गर्दी व त्याच बरोबर सतर्कतेकडे दुर्लक्ष होते. तसेच व्यवहार व थोड्या काळासाठी स्थलांतर ही. सुट्या असल्याने
या काळात लोकांच्या राहणीमानात नक्की काय बदल होतो ?
सर्व प्रथम लोक घरात खेळते भांडवल ठेवतात, महागड्या वस्तू, सोने नाणे, रोकड घरात आणतात. घरांना कुलूप लाहून फिरायला जातात. लॉकर मोकळे करून मौल्यवान चीजवस्तू पूजेसाठी अथवा परिधान करण्यासठी घरी ठेवतात.
मग चोरांचे कसे फावते अथवा त्यांना याच काळात चोरी करणे सुलभ कसे होते ?
सामान्य परिस्थितीत जी महागडी चीजवस्तू घरी ठेवली जात नाही ती या काळात ठेवली जाते. अनेकदा घरातील सभासदांच्या अनुपस्थितीत कुठे तरी कपाटात, घडी खाली, एखाद्या डब्यात अथवा गुपित ठिकाणी. दुर्दैवाने ती जागा चोरांना सरावाची असते.
चोर नक्की कशी चोरी करतात ?
चोर पाळत ठेऊन, रेकी करून चोरी करतात, चोर तुमच्या घरातील घडामोठी, जाण्या येण्याच्या वेळा, घरातील माणसे, दिशा, स्थान, शेजारीपाजारी, खोल्यांचे ठिकाण अर्थात शयमगृह, किचन, बैठक खोली यांचा अभ्यास करतात. बहुतेकदा चोर हे घराच्या पुढील बाजूने न प्रवेश करता मागील आड, अडनगळीच्या दिशेने प्रवेश करतात.
CCTV चा उपयोग होतो का ?
हा प्रश्न अवघड आहे, बहुतांश प्रकरणात होत नाही कारण CCTV दृश्य दाखवते चोरांना पकडत नाही. दुसरे जर चोरांनी तोंड झाकले अथवा मास्क घातला तर तो सापडणे अवघड असते. पण तरी ही CCTV असल्यास काही प्रमाणात फायदा होऊ शकतो विशेषतः मोठ्या गुन्ह्यात.
प्रतिबंधात्मक उपाय कोणते ?
१ घर सोडतांना चीजवस्तूंची यादी करावी तसेच वस्तूंचे व त्या जेथे ठेवल्या त्या ठिकानचे फोटो काढावे.
२ तुम्ही बाहेर गावी जात आहात हे श्यक्यतो परिसरात सांगण्याचे टाळावे.
३ घराचे पुढचे दरवाजे जसे भक्कम असतात तसे मागील बाजूचे व टेरेस वरील ही असावे. चोऱ्या तेथूनच अधिक होतात.
४ घरात तुमच्या अनुपस्थितीत मौल्यवान वस्तू अजिबात ठेवू नये.
५ घरात कुत्रा आहे सावधान हा फलक दरवाज्यावर लावावा.
६ बाह्य बाजूचे सर्व दरवाजे भक्कम लोखंडी ग्रीलचे असावे
७ दरवाज्यावर मोठ्या अक्षरात घरात काही ठिकाणी विदूत करंट सोडला आहे हे नमूद करावे. परंतु शक्यतो तसे करू नये. अनोघाणे आपल्यालाच करंट लागू शकतो.
८ CCTV लावायचाच असेल तर घरच्या मागील व आतील बाजूस ही लावावा.
९ शेजाऱ्यांशी सबंध गोडव्याचे असावे. वेळेवर तेच कामी येतात बाहेर गावी असतांना मधून मधून त्यांचा फोन करीत रहावे.
९ सणासुदीच्या काळात घरात अनेक लोक येतात जसे पेंटर, सुतार, गॅसवाले, साहित्य दुरुस्ती करणारे, डिलिव्हरीबॉय त्यांच्या वर नजर ठेवावी व त्यांचा पत्ता नाव व माहिती विचारून घेत नोंद ठेवावी, शक्य झाल्यास फोटो असावा.
११ माहितीतील व्यक्ती व्यतिरिक्त कुणासही घराच्या आत बोलावू नये. अगदी दुरुस्तीसाठी ही.
१२ शक्यतो आलेली व घेतलेली वस्तू ही स्वतः बाहेर जाऊनच घ्यावी.
१३ बाहेर जाताना स्वतःस मढवून जाऊ नये. शक्य झाल्यास बेंटेक्स वापरावे.
चोरी झाल्यास प्रथम काय करावे ?
१ सर्वप्रथम पोलीसांना पाचारण करावे.
२ घरातील एकही वस्तूला पोलीस येण्या अगोदर हात लावू नये विशेषतः ज्या ठिकाणी चोरी झाली त्या ठिकाणी.
३ आहे त्या परिस्थितीचे फोटो मात्र काढून घ्यावे.
४ जास्त कांगावा करू नये घरात बघ्यांची गर्दी करू नये. डोके शांत ठेवावे.
५ चोराने नक्की काय चोरी वा नुकसान केले आहे हे वरवर तपासून पाहावे.
६ सर्व महत्वाची व चोरीस गेलेली कार्ड आधी ब्लॉक करावी.
७ घटने पूर्वीचा दरम्यानचा व पुढचा प्लॅन वा योजना कुणाला तात्काळ सांगू नये. कदाचित चोर तेथेच असू शकतो.
८ पोलीसांशी नम्रतेने व सौजन्यमे वागावे. कोणतीही माहिती त्यांच्या पासून लपवू नये.
९ संशयित व्यक्तीची माहिती आधी द्यावी.
१० पक्की तक्रार नोंदवूनच घ्यावी व त्याची प्रत देखील.
११ पोलीसांच्यात व तुमच्यात काय बोलणे झाले हे कुणासही सांगू नये.
१२ तक्रार अर्ज करतांना स्थानिक पोलीस ठाण्याबरोबरच आयुक्त व अधीक्षक यांना देखील प्रत पाठवावी.
” सर्वात महत्वाचे बहुताशी चोर हा नात्यातील, माहितीतील वा ओळखीतलाच असतो”
संपादक
दि सेपिअन्स न्यूज